Sapiens - A brief history of Mankind by Yuval Noah Harari-Part-2-मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहासः सॅपियन्‍स- लेखक - युवाल नोह हरारी-भाग-२

आदिमानव ते आधुनिक मानवाची कथा

मानव जातिचा संक्षिप्‍त इतिहास
सॅपियन्‍स

युवाल नोह हरारी

पुस्‍तक सारांश

  भाग-2


 
Book summary in Marathi of Sapiens - A brief history of Mankind by Yuval Noah Harari.
मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहासः सॅपियन्‍स- लेखक -
युवाल नोह हरारी- पुस्‍तक सारांश 

 

सॅपियन्‍स- मानवजातीची संक्षिप्‍त कथा- मराठी
मागील भाग-१ मध्‍ये आपण पाहिलं होतं की,

कसं वानरापासून-माकडापासून मानवाची उत्‍पत्‍ती-उत्‍क्रांती झाली. 

अग्‍नीचा शोध, कृषीक्रांती यांमुळे मानवामध्‍ये प्रचंड परिवर्तन झाले.

आणि मानवाची शिकारी ते शेतकरी असा प्रवास  होऊन स्‍थीर झाल्‍यावर, शेतीपासून मिळालेल्‍या फावल्‍यावेळेत समाज नावाची व्‍यवस्‍था उदयास आली.

त्‍या समाज व्‍यवस्‍थेत लढाया-तंटे यांवर लगाम ठेवण्‍यासाठी धर्म, राजा,सैन्‍य,पद अशा कल्‍पीत सत्‍यांचा आविष्‍कार झाला.

लहान संस्‍कृती महान बनल्‍या, महान संस्‍कृतींना टिकविण्‍याठी साम्राज्‍य बनविले गेले. 

  

 भाग-१                                                     भाग-२


साम्राज्‍य बनविण्‍यासाठी अशा माध्‍यमाची गरज होती जे वेग-वेगळ्या संस्‍कृतींवर विश्‍वास ठेवणा-या होमो सॅपियन्‍सना एकत्रित करतील. 

 असे तीन-३ माध्‍यम आहेत जे वेगवेगळ्या संस्‍कृतींच्‍या होमो सॅपियन्‍स म्‍हणजेच मानवांना एकत्रित करू शकतात आणि ती माध्‍यमे आहेतः  

 

      • पैसा
      • राजनीती आणि 
      • धर्म     

  

१.  पैसा (Money-Currency)  :

💰 पैसा  💸

मानव कोणत्‍याही धर्माचा का असेना ते पैशावर विश्‍वास ठेवतात.  मानतात. सुरूवातील व्‍यापार करण्‍यासाठी ''बार्टर सिस्‍टीम'' -वस्‍तू विनिमय पद्धत - उपयोगात आणली जात होती.  समजा- कोणी फळे जसे-सफरचंद, उगवत असेल आणि दुसरा ब्रेड-पाव बनवत असेल तर ते आपापसांत सफरचंद आणि ब्रेड-पाव यांची आदलाबदल करू शकत होते.   

परंतू समूह मोठे असेल आणि वस्‍तूंची मात्रा जास्‍त असेल तर बार्टर सिस्‍टम-वस्‍तू विनिमय पद्धत खूपच क्लिष्‍ट-किचकट होऊन जाते.  ह्याच समस्‍येतून बाहेर येण्‍यासाठी पैशाचा आविष्‍कार करण्‍यात आला.  

पैसा वस्‍तूंना देवाण-घेवाण करण्‍याचा वैश्‍विक माध्‍यम बनला. 

प्रारंभी धातूंचे तुकडे यांचा उपयोग पैशांच्‍या रूपात वस्‍तूंच्‍या देवाणघेवाणीसाठी होऊ लागला.  नंतर  सोने-चांदीचे नाणे, मग साध्‍या धातूंची घडविलेली नाणी ज्‍यांवर राजाचा अधिकार असायचा.  

आणि आजच्‍या तारखेत कागदांच्‍या पैशांवर शासनाचा-सरकारचा अधिकार आहे.  जे चलन-पैसा म्‍हणून आज आपण उपयोगात आणत आहोत. 


२.  राजनीती (Politics) :

 💰 राजनीती  💸

दुसरे माध्‍यम राजनीती. साम्राज्‍यात सम्राट, राजा किंवा शासक आणि त्‍याचे लष्‍कर-सैन्‍य ज्‍यांनी बराच काळ वेगवेगळ्या संस्‍कृतींना मानणा-या मानवांच्‍या समूहांवर राज्‍य केलं.   आणि त्‍यांना सर्वसामान्‍य कायदे त्‍यांच्‍यावर लादून त्‍यांवर चालण्‍यास सक्‍ती केली. 

छोट्या-छोट्या, लहान-लहान संस्‍कृतींना, राज्‍यांना संपवून (नाश करून-Destroyed) मोठ-मोठ्या सम्राट व राजांनी एक समान पण मोठे आणि महान संस्‍कृती (Mega Culture) विकसित केली.  आणि का‍ही पिढ्यानंतर कोणाला लक्षातसुद्धा राहिले नाही की त्‍यांची मूळ संस्‍कृती कोणती होती. 

आणि म्‍हणूनच ते साम्राज्‍य संपल्‍यानंतरसुद्धा त्‍या शासनकर्त्‍यांचा त्‍यांनी सक्‍तीने लादलेले कायदे ते चालू ठेवू लागले होते.  

उदाहरनार्थः 

  • अरब-मुस्लिम साम्राज्‍ये येण्‍याअगोदर इजिप्‍त, सिरीया, इराण, तेहराणमध्‍ये सर्वांचे आपापली      स्‍वतःची स्‍थानिक संस्‍कृती होती. (Local Cultures) 

  • १७-व्‍या शतकात अरब-मुस्लिम साम्राज्‍याचे शासन आल्‍यामुळे ते अरब-ईस्‍लामिक संस्‍कृतीला  अनुसरण करू लागले.  आणि अरब-ईस्‍लामिक-मुस्लिम साम्राज्‍य विघटन होऊनही, आजही तेथील समाज अरब-ईस्‍लामिक-मुस्‍लिम संस्‍कृतीचेच अनुसरण करतात.

  • दुसरे उदाहरण म्‍हणजेः भारतात कित्‍येक वर्षे ब्रिटिशांनी राज्‍य केले.  त्‍यांनी सक्‍तीने त्‍यांची  व्‍यवस्‍था-कायदे-पद्धती आणि भाषा भारतीयांवर लागू केल्‍या. 

  • परंतू त्‍यांच्‍या परत जाण्‍यानंतर सुद्धा आजही भारतीय ब्रिटिशांची इंग्रजी भाषा बोलतात, वापरतात.  त्‍यांची शासन व्‍यवस्‍था, कार्यपद्धतीचे अनुसरण करत आहेत.


३.   धर्मः 

🌐🌍ૐ⛪🛕🕌धर्म🕌⛪🛕ૐ

कृषीक्रांतीनंतर होमो सॅपियन्‍स-मानव एकाजागी स्‍थीर (Settled) झाले.  तेंव्‍हा ते आपल्‍या जगण्‍यासाठी हवामानावर अवलंबन राहू लागले.  यामुळे जेंव्‍हाकेंव्‍हा एखादा आजार किंवा आपत्‍ती (Disaster or Disease) येत असे, त्‍यांपासून बचाव करण्‍यासाठी मानवांनी कल्पित देवतांचा आविष्‍कार केला.  ह्या देवता स्‍थानिक होत्‍या आणि निसर्गाशी संबंधित होते.  

जसे- वरुण देव- (Rain god)  पावसाशी संबंधित, सुपिकतेसाठीची देवता (Fertility god)

समाजाचा विकास होता-होता, संरचनेत क्लिष्‍टपणा वाढला तसा देवतांची संख्‍याही वाढली. 

आणि समाजात (Polytheism) बहु-ईश्‍वरवाद आला. 

(Polytheism- Belief in many gods-म्‍हणजेच एकापेक्षा अधिक देवांवर विश्‍वास-श्रद्धा) 

Polytheism-बहु-ईश्‍वरवाद यामधूनच मग Monotheism म्‍हणजेच एकेश्‍वरवाद बाहेर आले.

 Monotheism- Belief in one god.

ख्रिश्‍चन आणि ईस्‍लाम हे दोन्‍ही एकेश्‍वरवादी धर्मसंस्‍था आहेत.  म्‍हणजेच सर्वांचा एकच ईश्‍वर आहे यावर विश्‍वास व श्रद्धा ठेवणारे धर्म.  आणि दोन्‍ही धर्म मिश्‍नरीज स्‍वभावाचे आहेत म्‍हणजेच, या धर्माचे अनुयायी या धर्माचा प्रचार-प्रसार-फैलाव (Spread and Propagate) करण्‍यावर विश्‍वास ठेवणारे असतात. 

यानंतर ५-व्‍या शतकाच्‍या जवळपास एका अशा धर्माचा उदय-विकास झाला जो की ईश्‍वरापेक्षा नैसर्गिक कायदे-नियमांवर विश्‍वास ठेवणारा होता. 

जसे- बौद्ध धर्म, जैनधर्म 

मग, आता प्रश्‍न असा उठतो की, धर्म ही एक काल्‍पनिक सत्‍य आहे तर लोकं त्‍यावर विश्‍वास का करतात?

याचे दोन कारण आहेत. 

  • धर्माचे अधिकार मानवांपासून नाही तर अति-मानवांपासूनच्‍या  शक्‍तींद्वारे मिळवले असल्‍याचा दाखवले जाते.  (Religion derives authority from super human powers

  • आणि दुसरे कारण म्‍हणजे मानवाला आपापसांमध्‍ये सहकार्य करण्‍यासाठी यामध्‍ये विश्‍वास/श्रद्धा ठेवणे सापे वाढते. 

 

आजच्‍या वैश्विक जगात धर्म (Religion) तर नाही पण विचारधारा/विचारसरणी (Ideologies) खूप बनल्‍या आहेत.  ज्‍या मानवाला एकत्रित सहकार्य करण्‍यास मदत करत असते. 

जसे- भांडवलवाद, समाजवाद, नक्षलवाद, राष्‍ट्रवाद इत्‍यादी

जर तुम्‍ही क्रिकेट किंवा फुटबॉलचा सामना बघायला जात असाल तेथे तुम्‍ही सर्व लोकांना ओळखणार नाही किंवा सर्वजण तुमच्‍या ओळखीचे राहणार नाहीत. 

परंतू चौकार-षटकार मारला गेल्‍यास किंवा फुटबॉलचा एखादा गोल झाल्‍यास तुम्‍ही त्‍यांच्‍यासोबत हर्षोल्‍लास-आनंद जरूर साजरा करणार. कारण तुम्‍ही सर्वजण एकाच देशाचे (राष्‍ट्रवादी) असल्‍यामुळे तुम्‍ही असे करता.

 

👉वैज्ञानिक/शास्‍त्रीय क्रांती आणि युरोपचा उदयः
(Scientific Revolution and Rise of Europe)

बरीच वर्षे मानव विचार करत होते की जे धर्मात आहे तेच खरं आहे आणि त्‍यापेक्षा जास्‍त त्‍यांना काही माहिती करू नघेण्‍याची गरज नाही. परंतू १६-व्‍या १७-व्‍या शतकामध्‍ये हे बदलले. 

युरोप शास्‍त्रीय क्रांतीचे केंद्र बनले. याचे दोन कारण आहेत. 

युरोपीयन्‍सनी हे स्‍विकारलं की मानवाला सगळकाही माहित नाहीआणि त्‍यांना अधिक संशोधन/शोध घेण्‍याची गरज आहे.   आणि तेथील भांडवलवादी अशा गोष्‍टीला पुरस्‍कृत करू लागले.  प्रायोजकत्‍व देऊ लागले.

संशोधन करण्‍याची साधी पद्धत अवलंबविली गेली. 

Observation ➡️ Conclusion ➡️ Equation

    निरिक्षण

⬇️

निष्‍कर्ष

⬇️

समीकरण

अगोदर निरिक्षण करणे त्‍यानंतर त्‍या निरिक्षणांना एकत्रित करणे आणि निरिक्षणांचा वापर करून त्‍यांचे निष्‍कर्ष काढणे आणि त्‍याचे सूत्र बनविणे.  

ह्याच पद्धतीचा वापर करून १७-व्‍या शतकामध्‍ये आयझॅक न्‍युटनने (Laws of Motion) गतीचे नियम जगाला दिले.  आणि जी गोष्‍ट तंतोतंत माहिती करता येत नाही त्‍यांना (Probability) संभाव्‍यतेच्‍या रूपाने व्‍यक्‍त करून दाखविले जाऊ लागले.  

Actuarial Science-विमागणितशास्‍त्र जो विमा क्षेत्रामध्‍ये वापरले जाते. हे सांख्यिकीय आणि संभाव्‍यतेवर आधारीत आहे. 

युरोपची अज्ञाताचा शोध इतका जोरदार होता आणि काहीतरी नवीन जाणून घेण्‍याची ईच्‍छा इतकी तीव्र होती की तेथील नाविक-खलाशी धाडसी शोधमोहिमांसाठी प्रायोजक शोधू लागले.

कोलंबस जो की एक छोटा खलाशी होता.  त्‍याने कित्‍येक साम्राज्‍यांच्‍या शासकांना/राजांना नव-नविन खंडांचा शोध घेण्‍यासाठी पैशांची/आर्थिक मदतीची मागणी केली.  शेवटी स्‍पेनचे शासक कोलंबसच्‍या ह्या शोधमोहिमेसाठी तयार झाले. 

कोलंबसने आपल्‍या शोधमाहिमेत अमेरिकेचा शोध लावला.  आणि तेथील कच्‍चा माल वापरून स्‍पेश एक अतिषय श्रीमंत राज्‍य बनले. 

त्‍यानंतर शोधमोहिमांचा व खलाशांच्‍या दर्यावर्दीपणाच्‍या कल्‍पनेला एवढा वाव भेटला/प्रसिद्ध झाला की राजासोबतच साधा माणूस देखील Joint Stock Exchange (Company) संयुक्‍त रोख्‍यांच्‍या खरेदी-विक्री केंद्राच्‍या/संस्‍थेच्‍या/कंपनीच्‍या मदतीने खलाशी शोधमोहिमांना प्रायोजकत्‍व देऊ लागले.  त्‍यामध्‍ये भाग घेऊ लागले. 

अशाच खलाशी-शोधमोहिमांमुळे युरोपीयन्‍स धरतीचे राजे झाले.  

असे नाही की आशिया किंवा चीनी साम्राज्‍यांकडे शोधमोहिमांसाठी तांत्रिक-कौशल्‍ये नव्‍हती, परंतू तेथील शासक आपल्‍या राज्‍याबाहेर जायला जास्‍त स्‍वारस्‍य दाखवत नव्‍हते. 

त्‍यांच्‍यामध्‍ये युरोपियन्‍स सारखे नविन काही शिकण्‍याची ईच्‍छा नव्‍हती.  ह्यामुळेच खलाशी-शोधमोहिमांच्‍या बाबतीत युरोपियन्‍सच्‍यापेक्षा ते मागे राहिले.


👉 औद्योगिक क्रांतीः Industrial Revolutionः  🏭

औद्योगिक क्रांती अगोदर मानव आपल्‍या उर्जेच्‍या गरजेसाठी लाकडाला जाळत होते.   काही वर्षानंतर कोळसा उर्जा-इंधन म्‍हणून वापरात येऊ लागला होता. 

 

महत्‍वपूर्ण आणि मोठा परिवर्तन आला तो वाफेच्‍या इंजिनच्‍या आविष्‍कार/शोधानंतर.  उष्‍णता ह्या उर्जेच्‍या रूपाला गतीमध्‍ये बदलून. (heat energy converted in to motion).

 

ह्या तंत्रज्ञानाचा वापर करुन मालाचा यांत्रिक पद्धतीने उत्‍पादन होऊ लागला. 

आजचा समाज जेथे आपण जगत आहोत, ज्‍याचे वेळापत्रक औद्योगिक क्रांतीनेच ठरवलेलं आहे. 

औद्योगिक क्रांतीमध्‍ये खूपसारे कारखाने स्‍थापित होऊ लागले.  आणि ह्या कारखान्‍यांमध्‍ये लाखो लाकं काम करू लागले.  ०९ ते ०५ काम ही कल्‍पना औद्योगिक क्रांतीचीच देणगी आहे. 

लाखो लोकांना वेळेवर कामाच्‍या ठिकाणी कारखान्‍यावर पोहोचविण्‍यासाठी सार्वजनिक वाहतूक-दळणवळण यंत्रणा-व्‍यवस्‍था उभारली गेली.  उत्‍पादन आणि व्‍यापारामध्‍ये एकसारखेपणा/एकजिनसीपणा (Uniformity) आणण्‍यासाठी राष्‍ट्रीय वेळ (National Time)  बनविण्‍यात आलं.

 औद्योगिक क्रांतीमुळे मालाचे उत्‍पादन वाढल्‍यामुळे अजून एक समस्‍या पुढे येऊ लागली.  ती नवीन समस्‍या अशी होती की, तयार केलेल्‍या ह्या मालाला खरेदी करणार कोण? 

अधिकतर लोकं कारखान्‍यामध्‍ये कामगार होते.  ज्‍यांची पगार अतिषय कमी होती.  परंतू मानवाने ह्या समस्‍येमधून बाहेर येण्‍यासाठी एका काल्‍पनिक अनुक्रम (Imagined order) या संकल्‍पनेचा आविष्‍कार/विकसित केला.  आणि ती संकल्‍पना होती उधार (CREDIT)..

क्रेडीट-उधार म्‍हणजेच आज भलेही तुमच्‍याजवळ एखादी वस्‍तू/माल खरेदीसाठी पैसा नसेल.   परंतू भविष्‍यात तुम्‍ही पूर्ण पैसा चुकवू/देऊ शकता.

उधारीवर मानवाला वस्‍तू/माल/उत्‍पादन देण्‍याठी लोकांना पटवण्‍यासाठी ग्राहकवाद (Consumerism) या संकल्‍पनेचे तत्‍वज्ञान वर आले. 

विक्री मोहिम (Marketing Campaign) व्‍हायला लागले.   फॅशनच्‍या नावाखाली लोकांच्‍या मनाच्‍या प्रवृत्‍तीला प्रभावित करून बदलविण्‍यात आले. 

अगोदरच्‍या काळातील संयुक्‍त कुटुंब संरचना (Joint Family Structure) ग्राहकवादाच्‍या समोरील एक मोठे आव्‍हान होते.   ग्राहकवादाच्‍या अगदी विरूद्ध होते.  कारण संयुक्‍त कुटुंबामध्‍ये राहणारे सदस्‍य एकमेकांना वस्‍तू वाटत असत किंवा वापरायला देत असत.  आणि सोबतच कोणतीही वस्‍तू खरेदी करताना/घेताना ते एकमेकांचे मत विचारात घेत असत.

संयुक्‍त कुटुंबाच्‍या ह्या संरचनेला तोडण्‍याचे काम राज्‍य प्रशासनाने केले.  संयुक्‍त कुटुंबाची भूमिका घेऊन/आत्‍मसात करण्‍याचे कार्यभार राज्‍य प्रशासनाने आपल्‍या हाती घेतले. 

पुर्वी मानवाचे स्‍थानिक समूह (local community) समूहसदस्‍यांच्‍या आरोग्‍य, शिक्षण आणि सुरक्षेची काळजी घेत होते.   राज्‍य शासनाने लोकांच्‍या शिक्षणासाठी सार्वजनिक शाळा बनविल्‍या, त्‍यांच्‍या आरोग्‍यासाठी रुग्‍णालये बनविली आणि संरक्षणासाठी पोलिस आणि कायदे बनविले. 

ह्याचा निष्‍कर्ष असा निघाला की, लोकं आपल्‍या संयुक्‍त कुटुंबापासून दूर जाऊन कोठेही जगू शकतात. 

भावनिक मोहिमा जसे- 

  • आपल्‍या स्‍वप्‍नातील जोडीदारासोबत लग्‍न-Marry partner of your dream

  • करून दाखवा- Just Do it.

  • जगभ्रमंती-Explore the World

अशा प्रकारच्‍या मोहिमा मानवी मनाला प्रभावित करू लागले.  आणि त्‍यांच्‍या कुटुंब व्‍यवस्‍थेला/संरचनेला तोडून विभक्‍त कुटूंबामध्‍ये Nuclear Family परिवर्तीत करून टाकलं. 

 

👉सुख/आनंद, भुतकाळ आणि वर्तमान (Happiness, Past and Present)

एवढी वाढ व विकास करून एक प्रश्‍न पडतो की काय मानव सुखी/आनंदी आहे?

आज आपल्‍याजवळ संपर्काची अत्‍याधुनिक साधने तर विपुल आहेत.  परंतू आपण भावनिकदृष्‍ट्या एकटेच आहोत. 

मानवाचा मूळ स्‍वभाव शिकारी आणि जमावाचा आहे किंवा मूळ स्‍वभावाने मानव भटक्‍या स्‍वरूपाचा आहे.   आज आपण आपल्‍या मूळ स्‍वभावाच्‍या विरूद्ध आज एका व्‍यवस्‍थेत बांधून गेलेलो आहोत. 

आजपर्यंत आपली उत्‍क्रांती नैसर्गिकरित्‍या झाली आहे.  

परंतू पुढे भविष्‍यात येणारे तंत्रज्ञान जसे- जैवतंत्रज्ञान, अनुवंश अभियांत्रिकी, नॅनो टेक्‍नोलॉजी, गुणसुत्र परिवर्तन, कृत्रिम अंगे अश्‍या सर्व प्रकारच्‍या संकल्‍पना आपल्‍या नैसर्गिक उत्‍क्रांतीला बदलू शकतात.  जे मानवाला अतिमानव बनवू शकतात. 

परंतू, प्रश्‍न अजूनही मानवासमोर तोच आहेः

काय हे तंत्रज्ञान मानवाला सुख/आनंद देऊ शकतील?

आफ्रिकेच्‍या जंगलामधून विकसित होऊन आज आपण आपल्‍या मोबाईल आणि लॅपटॉप सारख्‍या साधनांवर व्हिड‍िओ बघत आहोत.

परंतू अजूनही प्रश्‍न तोच उद्भवतो की,

 काय होमो सॅपियनला म्‍हणजेच मानवाला म्‍हणजेच आपल्‍याला सुख/आनंद मिळेल?

 

मित्रांनो माकड-वानर-ते मानव, शिकारी-सहकारी ते शेतकरी, खलाशी ते व्‍यापारी तसेच धर्म, पैसा, राजनीती अश्‍या ब-याच गोष्‍टींना आपण मानव जातीचा संक्षिप्‍त इतिहासः सॅपियन्‍स- लेखक - युवाल नोह हरारी-   पुस्‍तकातून बघितलं.

 भाग-१ वाचण्‍यासाठी

 --------#-#--------

खालील दिलेल्‍या लिंकवरून पुस्‍तकाची मराठी आवृत्‍ती खरेदीकरू शकता.  

 मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी

  

पुस्‍तक: मानव जातिचा इतिहास-''द सॅपियन्‍स'

लेखक:   युवाल नोह हरारी 

अनुवादः  वासंती फडके

प्रकाशक :   डायमंड पब्लिकेशन
ऑनलाईन पुस्‍तकः        अमेझाॅन           फ्लिपकार्ट      किंडल-ई-बुक         ऑडियो-बुक

 

 

वाचकहो हे पुस्‍तक सारांश तुम्‍हाला कसे वाटले, आणि तुम्‍हाला हवी असणारे एखाद्या पुस्‍तकाचे सारांश खाली टिप्‍पणीद्वारे आवश्‍य कळवा. आम्‍ही त्‍यावर सारांश अवश्‍य बनवू.

पुढील पुस्‍तक सारांश चे अपडेट लगेच तुम्‍हाला समजण्‍यासाठी आपल्‍या ई-मेल आयडीने ह्या ब्‍लॉगची सदस्‍यता घ्‍या.  हे अगदी मोफत आहे.

 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive